"गुंतवणूक कट्टा" सपोर्ट सेंटर
पेपर ट्रेडिंग म्हणजे काय?
क्रिकेटची मॅच खेळण्याअगोदर खेळाडु ज्याप्रमाणे "नेट प्रॅक्टिस" करतात, त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष पैसे गुंतवुन काम करण्याअगोदर "पेपर ट्रेडिंग" केले जाते.
पेपर ट्रेडिंग म्हणजे आपल्याला जे शेअर्स खरेदी विक्रीसाठी योग्य वाटतात ते प्रत्यक्ष खरेदी न करता फक्त पेपर एंट्री करणे आणि आपला अंदाज बरोबर येतो किंवा नाही याचा अभ्यास करणे.
पेपर ट्रेडिंग तुम्ही साध्या वहीमध्ये सुद्धा करु शकता.
जो शेअर तुम्हाला घ्यावासा वाटत असेल तो शेअर आपण घेतला असे खोटे खोटे लिहुन ठेवायचे आणि त्या शेअरबद्दलचा आपला अंदाज बरोबर येतो किंवा चूक याचा अभ्यास करायचा.
पेपर ट्रेडिंग करण्यासाठी काही वेबसाईट्स सुद्धा आहेत.
खाली त्यापैकी एका वेबसाईटची लिंक दिलेली आहे.
ही वेबसाईट कशी वापरावी हे जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.
शेअर मार्केटचे संपूर्ण प्रशिक्षण घेण्यासाठी पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन जॉईन करा