"गुंतवणूक कट्टा" सपोर्ट सेंटर
फ्युचर्स आणि ऑप्शन्स (FnO) ट्रेडिंग कोणी करावे?
फ्युचर्स आणि ऑप्शन्स (FnO) अर्थात डेरिव्हेटिव्हस मार्केट हे एक हेजिंगसाठी तयार केलेले मार्केट आहे.
हे मार्केट प्रामुख्याने मोठ्या इन्व्हेस्टर्ससाठी असते.
मोठे इन्व्हेस्टर्स म्हणजेच ज्यांच्याकडे शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ आहे असे गुंतवणूकदार!
फ्युचर्स चा एक लॉट हा सुमारे पाच ते दहा लाख रुपयांहुन अधिक किमतीचा असतो.
म्हणजेच या सेगमेंटमध्ये काम करण्यासाठी आपल्याजवळ पाच ते दहा लाख रुपयांचे एकाच कंपनीचे शेअर्स असले पाहिजेत.
तुमचा पोर्टफोलिओ जर याहुन कमी असेल तर तुम्ही फ्युचर्स आणि ऑप्शन्स मार्केटमध्ये काम करणे टाळले पाहिजे.
कारण या मार्केटमध्ये लहान गुंतवणूकदारांचे कायम नुकसान होते हा इतिहास आहे.
फ्युचर्स आणि ऑप्शन्स मार्केटबद्दल सविस्तर ट्रेनिंग आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमधील "गोल्ड लेव्हल"मध्ये दिलेले आहे.
तुमचा पोर्टफोलिओ जर मोठ्या आकाराचा असेल तर येथे क्लिक करुन तुम्ही FnO सेगमेंटबद्दल सविस्तर ट्रेनिंग घेऊ शकता आणि यामध्ये काम करु शकता.
तुमचा पोर्टफोलिओ जर लहान असेल तर सर्वप्रथम इक्विटी शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ डेव्हलप करा. यासाठी आपल्या "सिल्व्हर लेव्हल"मध्ये सविस्तर प्रशिक्षण मिळेल.