top of page

डीमॅट अकाऊंट कुठे उघडावे?

शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारची अकाऊंट्स उघडावी लागतात.

1- ट्रेडिंग अकाऊंट- हे अकाऊंट शेअर्सची खरेदी व विक्री करण्यासाठी आवश्यक आहे.

2- डीमॅट अकाऊंट- खरेदी केलेले शेअर्स ठेवण्यासाठी डीमॅट अकाऊंट आवश्यक आहे.

जेव्हा आपण कोणत्याही ब्रोकरकडे डीमॅट अकाऊंट उघडतो, तेव्हा ही दोन्ही अकाऊंट्स उघडली जातात.

स्टॉक ब्रोकर्सचे दोन प्रकार आहेत.

1- फुल सर्व्हिस ब्रोकर- या ब्रोकर्सकडे आपल्याला एक रिलेशनशिप मॅनेजर दिला जातो. हा मॅनेजर आपल्याला आपल्या कामामध्ये मदत करतो. नविन लोकांनी "फुल सर्व्हिस ब्रोकर"कडे अकाऊंट उघडणे योग्य ठरते कारण कुठेही काही अडचण आली तर ब्रोकर आपल्याला पूर्ण सर्व्हिस देतो.

2- डिस्काऊंट ब्रोकर- या ब्रोकर्सकडे आपल्याला सर्व काम हे ऑनलाईन करावे लागते. सर्व्हिससाठी रिलेशनशिप मॅनेजर दिला जात नाही. तुम्हाला शेअर मार्केटची कार्यपद्धती व्यवस्थित माहिती असल्यास "डिस्काऊंट ब्रोकर"कडे अकाऊंट उघडणे योग्य ठरेल.

भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या ब्रोकिंग कंपन्या अस्तित्वात आहेत ज्या आपल्याला ब्रोकिंग सर्व्हिसेस देतात.

या सर्व कंपन्या सेबीद्वारे रेग्युलेटेड असतात आणि सेबीकडे नोंदणी असलेल्या सर्व ब्रोकिंग कंपन्या सुरक्षित आहेत.

फुल सर्व्हिस ब्रोकरकडे अकाऊंट उघडायचे असल्यास तुम्ही Edelweiss हा ब्रोकर निवडु शकता. Edelweiss मध्ये अकाऊंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा.

डिस्काऊंट ब्रोकरकडे अकाऊंट उघडायचे असल्यास तुम्ही Zerodha हा ब्रोकर निवडु शकता. Zerodha मध्ये अकाऊंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा.

फुल सर्व्हिस ब्रोकर Edelweiss चे चार्जेस जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा

फुल सर्व्हिससाठी तुम्हाला Edelweiss Elite हा प्लॅन निवडायचा आहे

डिस्काऊंट ब्रोकर Zerodha चे चार्जेस जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा

bottom of page